Bank Of Baroda Bharti 2026
नमस्कार,
बँकेत नोकरी शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी बँक ऑफ बरोदा मध्ये मोठी भरती निघाली आहे. या भरती मध्ये लोकल बँक ऑफिसर या पदाच्या एकूण २४८२ इतक्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या भरती ची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. माहिती काळजीपूर्वक वाचा व तुमच्या इतर मित्र मैत्रीणीना देखील पाठवा.
महत्वाची माहिती -
भरती करणारी संस्था - बँक ऑफ बरोदा
पदाचे नाव - लोकल बँक ऑफिसर
पदाची श्रेणी - JMG/S-l
एकूण रिक्त जागा - २४८२
अर्ज पद्धत - ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख - १८/०८/२०२६
अर्ज करण्याची शेवटची तारीख - ०७/०९/२०२६
वयाची अट - २१ ते ३० वर्षे
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी
अनुभव - किमान १ वर्षे बँकेत ऑफिसर म्हणून अनुभव
परीक्षा - ऑनलाईन पद्धतीने होईल.
अर्ज फी - GEN/EWS/OBC- ८५०/- व इतर १७५/-
नोकरी ठिकाण - अर्ज केलेल्या राज्यात
अतिरिक्त माहिती -
पदाचे नाव व एकूण पदसंख्या -
या बँकेतील भरती मध्ये Local Bank Officer या पदासाठी भरती होणार असून त्याच्या एकूण रिक्त जागा २४८२ आहेत आणि महाराष्ट्रासाठी १८० नवीन रिक्त जागा असून स्थानिक भाषा मराठी आहे. त्यामुळे खूप मुलांना नोकरी मिळवण्याची संधी येथे आहे.
शैक्षणिक पात्रता -
उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा संस्थेची कोणत्याही शाखेतील पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेलं असांव. या व्यतिरिक्त उमेदवाराकडे Scheduled Commercial Bank मध्ये Officer म्हणून पदवी प्राप्त केल्यानंतर किमान १ वर्षाचं अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा -
या पदासाठी उमेदवाराचे वय हे किमान - २१ वर्षे व कमाल ३० वर्षे इतके असावे. वयाचे मोजमापन हे ०१/०८/२०२६ या तारखेनुसार होईल.
आरक्षित प्रवर्गाला यामध्ये सुट देण्यात आलेली आहे.
SC/ST - ५ वर्षे
OBC - ३ वर्षे
PwBD - नियमानुसार सवलत
स्थानिक भाषेची पात्रता -
उमेदवाराने ज्या राज्यासाठी अर्ज केला आहे. त्या राज्याची स्थानिक भाषा उमेदवाराला येणे गरजेचे आहे.
परीक्षा फॉर्म फी -
GEN/EWS/OBC- ८५०/-
SC/ST PwBD/ESM/DESM/महिला - १७५/-
फॉर्म चे पैसे हे Non - Refundable आहेत.
मासिक पगार -
जाहिरातीनुसार या पदासाठी मासिक वेतनश्रेणी हि ४८४८०/- ते ८५९२०/- इतकी देण्यात आलेली आहे. याशिवाय बँक नियमानुसार इतर भत्ते मिळू शकतात.
नोकरीचे ठिकाण -
उमेदवार ज्या राज्यासाठी अर्ज करणार आहे. त्या राज्यातील बँकेच्या शाखांनमध्ये नोकरी दिली जाईल.
ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप -
विषय - English/ Banking Knowledge/ Generl/ Economic/Awareness/ Resoning Ability & Quantitative Aptitude सर्व विषयांचे एकूण १२० प्रश्न असतील व प्रत्येकी प्रश्नाला १ गुण या प्रमाणे १२० गुण असतील आणि वेळ हा १२० मिनिटे राहील. यानुसार उमेदवारांनी अभ्यासाची तयारी करावी.
अर्ज करण्यसाठी लागणारे महत्वाचे कागदपत्र -
Resume/PDF
१० वी १२ वी मार्कशीट व प्रमाणपत्र
पदवी चे प्रमाणपत्र
इतर शैक्षणिक प्रमाणपत्र
अनुभवाचे प्रमाणपत्र
जातीचे प्रमाणपत्र
आधार कार्ड
डोमिसाईल प्रमाणपत्र
पासपोर्ट फोटो
इत्यादी आवश्यक कागदपत्र अर्ज सादर करताना जवळ ठेवावी.
अर्जाच्या महत्वाच्या तारखा -
ऑनलाईन अर्ज सुरु - १८/०८/२०२६
अर्ज करण्याची शेवटची तारीख - ०७/०९/२०२६
फॉर्म ची फी भरण्याची शेवटची तारीख - ०७/०९/२०२६
ऑनलाईन परीक्षेची तारीख - बँकेकडून कळवण्यात येईल.
अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक -
अर्ज करण्याची लिंक - येथे क्लिक करा - Apply Here
अधिकृत संकेतस्थळ - येथे क्लिक करा - Official Website
जाहिरात (PDF GR) - येथे क्लिक करा - Click Here
आमचे channel जॉईन करा - येथे क्लीक करा
महत्वाची सूचना-
सर्व उमेदवारांनी अर्ज करण्याआधी आपली शैक्षणिक पात्रता, वय, बँकिग अनुभव, आणि स्थानिक भाषा इत्यादी पात्रता तपासून मग अर्ज सादर करावा.
आणि अशाच नोकरी च्या संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आमचे अधिकृत channel जॉईन करून ठेवा.
MazhiNaukriKatta